Saturday, May 15, 2010

उद्धव आणि राज यांनी मराठी माणसाकरिता एकत्र यावे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेला दिलेला पाठिंबा आणि उद्धव हे 'उत्तम फोटोग्राफर' हि राजनी उद्धवची केली स्तुती ह्या दोन्ही बातम्या सामान्य मराठी माणसांसाठी आनंदाच्या बातम्या आहेत.
उद्धव आणि राज यांनी एकमेकांना प्रतिस्पर्धी न मानता एकत्र येवून काम करावे अशी सामान्य मराठी माणसांची मनापासून इच्छा होती व अजूनही आहे. अंबरनाथ निवडणुकीतील सुरवात हि ह्या दोन्ही पक्षांनी भविष्यात एकत्र येण्या साठी उचललेले पाऊल ठरावे व त्याच बरोबर राज ठाकरे ह्यांना गृहीत धरणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला धोक्याची घंटा ठरावी असे दिसून येते. मागील चार-पाच वर्षात मनसेने केलीली आक्रमक आंदोलने व शिवसेनेसकट कॉंग्रेस-राष्टवादी पक्षातील तरुणांचा मनसेनेकडे असलेला ओढा ह्यामुळे राज ठाकरे ह्यांची स्वतंत्र अस्तित्व व ताकद निर्माण झालेली आहे. शिवसेनेकडे असलेली संघटना बांधणी, राजकीय अनुभव ह्याला मनसेच्या तरुण कार्यकर्त्याची साथ मिळाली तर कॉंग्रेस-राष्टवादी पक्षाला भविष्यात सत्तेत येणे अडचणीचे होईल. सद्यपरिस्थितीत उद्धव आणि राज आपापल्या पक्षांचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून जरी एकत्र आले तरी त्यांची ताकत पूर्वीच्या एकसंध शिवसेनेपेक्षा जास्त होईल असे वाटते. राजकारणात एक अधिक एक दोन न होता तीन व अधिक कसे होवू शकतात हे यानिमिताने तमाम देशवासियांना दिसून येईल. जर दोन्ही पक्षांनी भविष्यात एकमेकात विलीन होण्याचा विचार केला तर उद्धव आणि राज यांनी नेतृत्व बाबतीत वाद न घालता एकाकडे 'कार्यकारी प्रमुख पद' व दुसऱ्याकडे भविष्यातील 'मुख्यमंत्री' पद देवून तिढा सोडवता येईल, ह्याकामी शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे हे महत्वाची भूमिका निभावू शकतात.

शिवसेना-मनसे युतीच्या झंझावातास थांबविण्याची ताकद भविष्यात कोणाकडे असेल असे आजतरी दिसत नाही. कारण शिवसेना-मनसे तुफानीची आगेकूच असेल मराठी माणसाची आगेकूच.
मराठी माणसांचे राज्य यावे हि उद्धव आणि राजकडे विनंती.

जय महाराष्ट्र!

सचिन मेंडिस, वसई