Thursday, December 13, 2012

बोकड

नातेवाईकांच्या लग्नात मिळाला मान...

‘मटण’ आणण्याचा...

मान कसला...सन्मानाच्या वेष्टनात लपेटलेली 'हमालीच' ती...

अर्धा तास पारखत होतो बोकड.... कापण्याआधी...

तसं आपल्याला सिलेक्शनचा गंधच नाही...

'माणस' पारखता येत नाही तर बोकड कसले....

का कुणास ठाऊक वाटल आपण हि क्षणभर आहोत ज्योतिषी...

जिवंत जीवाचे भविष्य सांगणारे...

कारण माहिती होत मला त्या बोकडाच आयुष्य....भविष्य....क्षणभराच ....

तासभरात होणार होते त्याच्या जिवंत शरीराचे....सो कॉल्ड 'पिसेस'....

संध्याकाळी प्लेटमध्ये सजण्यासाठी

उजव्या बाजूला उभा असणाऱ्या ह्या बोकडाचा पाठीचा तुकडा...

कुणाच्या बरे प्लेटमध्ये येणार असेल....

गावातल्या कुणाच्या...कि मित्राच्या...

कुठे असेल तो आता...?

ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करत असेल का?

कि अहेराची वही चाळत असेल संध्याकाळचे एन्वेलेप भरण्यासाठी....

किती विचित्र विचार ह्या वेळी....

ते सुद्धा ह्या मानाच्या कामात...

छे ..छे ...राहून दे...जाऊ दे असे विचार...

'शेख, मटण अच्छा देना .... चरबी निकाल दे.....खा खा के बहोत चरबी चडी है लोगो को '...

Nirmal-shi Jatra:

Nirmal-shi Jatra:

Vahratne ekda yenari Nirmal shi jatra laanpani swargiy sukh devon jashi.... Nirmal sha jatrya-mine kharidi karyashi maja alikade Singapore-Bangkok tour minsha kharidi-peksha naakis havi-havishi vatate...!!

Sadharan november december mine ee jatra suru hoyashi...Jatra yasha agodar shalimine dilelo pocket money jamvya suru karyashe...Tigala pocke money bi kodo.. charane-athane....Jatre agodar gavat lagne jalele haydyat tar barkya pora hatat 1-2 rupaye posta padyasa pan vate karta karta 10-20 paishe vatya yashe.

Bahutek vela payi kivha cycle ghevon Nirmal gathyasa...Nirmal nakya pasun gardila suruvat hoyashi...Tamde-Hirve palstic she baje saglya yenarya hatat...tya awajane Jatert entry kelyaee vatavaran nirmiti hoyashi....Entry keli ka ujvya bajula hator crus kadnaryo 5-6 bayko behlele ahyasho...kay mandli cross kadon ghyashe tar kay premi tya manasha poria nava payla letter gondvon ghyashe...ti drillng machine bagtana mala deewar picture-sha 'Mera baap chor hai' shi athvan yashi....tyas bajula jhatpat lottery wale bhayshe...(ekda me rupashe 11 rupaye kelte...)

Mag grampanchayat sa jatra tax n Bharta aamshi entry hoyashi...Pani bharlele fugya-ye chendu, plastic chendu, aapti bomb, baje, talwari, topi, barkyo car naay te vimane, durbin, plastic so fold honaro kalo naag, sabnaye fuge...sagla hamtyasa...hamkhas khelna manje Jadoo-ee kaach...tya kachebhoti fold karon vegvegle photo hadyashe... mines ekhado vado-pav kivha bhel khashi....pudhe gela ga palnyat bhyasa...mag maut ka kuva...ekdum shevti kale shengadu....te hamtyashe...!!

Return yetana kale sane, hakar sane, khajur, kurmure akhhi pishvi bharyashi.... Jatret firta firta chukamuk hoyshi...kun tari ghalvyasa...mag shodhshod...nehmisas....mag partivo pravas...tondat bajo an eka hatat pani bharlelo fugo-chendu...tya dori-ee ek gath ujvya hatasha botala bandon hata talvyor chendu maryaso....gavsho poryo tiklyo-taklyo, hair-band, bangdyo aha kharidi karyasho.

Aate kaal badale...Ja jatert vahara nandrya padyasa ta aate roj nakyor an railway station baar dikhate...baryos vastu tar aate kuparya bunglyat sobat pan naat...aatyasha porana US-UK varne khelne yetyat nate Mall minshe Branded khelne avdatyat...Pan junya kalat ji Nirmal sha jatre-ee maja hoti ti mall mine naay....

Ahi Nirmal shi Jatra aate salu jale....Jamlas tar porana ghevon ek feri maryaso visar haay...Pora barobar todas aapla ghalvalela laanpan shodyasa an jagyasa..!!

Tumshe Anubhav comment mine manda..!

Kupari Jugalbandi​

9:33am Dec 6
नव्विला ती मा पुडश्या बाकोर ब्याह्याशी.......
फीटचे फीट दोन वेन्यो घालोन याशी,आन मेनवातीये नक्षी काडलेल्यो तांबड्यो रेबिनी घाल्याशी.
वर्गात खिरताना तीन माई कते - कते नजरानजर ओह्याशी,आन मंग मा पोटात फाळ याशिस बाकी ऱ्याशी.
मास्तरने इला शिक्षा केली गा मा जीवाई आकळ ओह्याशी,आन माला वर्गातने बायार काडला गा पापनी ओली ओह्याशी.
हिकवनीला जाताना लाँग-कट घेओन मा दापुडने जाशी,आन मांगो-माग मंग माई सायकल निंग्याशी.
मा मावशी घरा मेरे याई कागड्याई पट्टी होती,आठवड्याला दोनदा मावशी घारा माई फेरी पक्की होती.
जाता येता खूब वेळा बेठले पन बोल्याशी हिम्मत कय जाली नाय,दाव्वी स्येडोप आलो ताव गाडी कय पुडे सरकाली नाय.
दाव्विला माओ टांगो जालो पलटी आन घोडे जाले फरार,आन कॉलेज कऱ्या इने निवडला सेंट झेवियरसा आवार.
पडात उठात दाव्वी मे पन जालो,मामा ओळखीन आयटीया करोन कामा-ला लागलो.
मनातने ती नव्वित बगीलेली मूर्ती कय जात नोती,तरी मावशी घारा फेरी माऱ्याशी हिम्मत मात्री होथ नोती.
खूब वहरानंतर देवळा शिटी वासली तीगाळा नाव तीआ आयकीला,दऱ्योर जाऑन जाम रडलो तीगाळा कडे बरा वाटला.
लगीन ऑहॉन ती मास प्यारीश मीने आलती,पन उंबरा फुलागथीन नंद्र्या कय पडात नोती.
मंग कतेतरी मा माळोरश्या खोलीला दरबाजो लागलो,मावशीने आढलेल्या निरोपोर मे वराडलो.
मा पोरीआ बाळटीमालादेवळा पायऱ्योर बेठली,मा पोटात परत एकदा फाळ याशीस बाकी रेली.
जरा पुडे जाऑन फिरली आन 'माला आख मारलीआ?' आहा कयतरी बोयली,
'
नाय' अही मे नुस्तीस आथाये खून केली.
आली तहीस ती परत गेली,पटापट पायऱ्यो उतरोन रस्त्या लागली.
दोन वेन्यायी आते एक वेनी जालती,सलताना अडने-तडने हालोन माला जहनी टीलवितोती.
सुनिल डि'मेलो

5:45pm Dec 7
(सुनिल डिमेलो ह्यांच्याकवितेला त्याची वर्गमैत्रीण'शालिनी' हिने पाठविलेले पत्र वजा उत्तर....)

प्रिय सुनिल,
तुझी फेसबुक वरील मला संबोधित केलेली कविता वाचली अन डोळ्यात आठवणीचा पावसाळा उभा राहिला. म्हणूनच थोडं अनैतिक वाटून सुद्धा तुला हक्काने 'प्रिय' म्हणतेय. तुझी कविता मला सरळ आपल्या नववीच्या वर्गात घेवून गेली. खंर तर बरेच प्रश्न उभे करून केली तुझी कविता पण उत्तर शोधण्याची वेळ अन वय मागे पडलंय.
आठवते रे..सगळ आठवते...माझ्या मागच्या बाकावर बसायचा तू.........बोलाव म्हणून बोलन तुला कधी जमलच नाही...पण बऱ्याच वेळा डोळे तुझे बोलून गेले सर्व काही...'शार्पनर' मागण्याच्याबहाण्याने तू मला दिलेली पहिली हाक....अन नंतर रोज तुझ्या पेन्सील टोक मोडण....सवयीच झाल होत रे मला...सगळ्या आठवणी कशा टोचायला येतात त्या पेन्सीलीच्या टोकासारख्या.....सगळच राहील मनात ...अस्पष्ट...अव्यक्त...अन अस्वस्थ करणार....काळीज चिरून जाणार...
शाळेतून घरी आल्यावर केसाची वेणी सोडताना वाटायच....किती सोप्प आहे केसाचा गुंता सोडवणे...केस मोकळे करणे ....करता येईल का मलाअसच मोकळ माझ मन सुनीलकडे...कि गुंतागुंतवाढत जाईल....नाहीच जमल रे तेव्हा...सगळच राहील मनात ...अस्पष्ट...अव्यक्त...अन अस्वस्थ करणार....काळीज चिरून जाणार... आठवते रे..सगळ आठवते...घोसाळीच्या मैत्राणीकडे जेव्हा मी बदामे मागितली होती...का कस ठाऊक तू ऐकलस ...अन दुसर्या दिवशी...दोन्ही हात भरून बदामे माझ्या पुढ्यात ठेवलीस ....कसा वर्गभर वास पसरला होता 'बदामी'....अजून आहे रे तो वास मनात..आणून देशील का ती बदामे? मस्करी करते...उगाच मनाला लावून घेवू नकोस....
तू बरोबर बोललास....तुझ्या मावशीच्या घराशेजारीलआमची कागड्याची पट्टी...तू यायचाच रे मला शोधत ...संध्याकाळीवरचेवर...तुझ ते लपून पाहन अन आपली नजरानजर..खर सांगू, कागड्यापेक्षा मीच फुलायची जास्त...तुझ्या नजरेच्या स्पर्शाने...सुगंधित व्हायची एका अनामिक जाणीवेने...तेव्हा काय माहित त्याला 'प्रेम' अस म्हणतात .... अन सकाळी फुलायचा कागडा संपूर्ण भागात...माझ्या तंद्रीत मागे राहिलेला...माझ्या अव्यक्त प्रेमाचे पुरावेच जणू..नाहीच जमल रे तेव्हा...व्यक्त व्हायला..सगळच राहील मनात ...अस्पष्ट...अव्यक्त...अन अस्वस्थ करणार....
आठवतो का तुला तो पावसाळ्याचा दिवस...धुवाधार पाऊस शाळेतून घरी निघताना...कशी विसरली होती मी छत्री घरी....तू मागे उभा...हातात छत्री घेऊन तुझी...नाही नाही करीत तू कोंबली ती माझ्या हातात अन धूम धावत सुटला पावसात ...भिजत भिजत..कितीवेळ तरी मी उभी होती त्या पावसात छत्री घेवून स्तब्ध ....किती भिजली होती रे मी आतून तुझ्या तुझ्या मायेच्या ओलाव्याने...दुसऱ्या दिवशी तुझ्या त्या शिंका वर्गामध्ये...कितीवेळा वाटल तुला माझा रुमाल काढून द्यावा... आता कधी पावसाळ्यातछत्री विसरली कि डोळे मागे बघतात ....सुनील, तुझा चेहरा शोधतात...बाहेरून भिजता येईल रे...पण 'आतून' भिजणे....ते एकदाच....पहिल्या प्रेमात...नंतरच फक्त 'जमवून' घेण नि नेण.... पण...नाहीच जमल रे तेव्हा...व्यक्त व्हायला..सगळच राहील मनात ...अस्पष्ट...अव्यक्त...अन अस्वस्थ करणार.... शेवटपर्यंत वाटत राहिलं कि तुझा निरोप येईल...आपल्या शिक्षणात अन्तर असून सुद्धा पप्पाची समजूत घालीन ...पण तू शाळेनंतर गायब झालास तो आता असा भेटलास फेसबुकच्या कवितेत...वेळ निघून गेल्यावर...
अरे वेड्या, अलीकडे तुझ्या मुलीच्या बारशाला चर्चच्या पायरीवर चढताना तुली हाक दिली तर तू....तसाच रे...नाहीच बदलला..वाटते शाळेत असताना तुला विचारलं असतं तर...माझ्याही आयुष्यात रातराणी फुलली असती, कदाचित...ओसाड डोळ्यात पापणी भिजली असती एखादी कदाचित ... वाटत काळाने मागे सराव...खूप खूप पाठी वर्गात तुझ्या समीप न्याव...तीच हुरहूर...तोच विरह...तीच भीती....एकदा फुलून जावं तुझ्यापाशी...होवून तुझी प्राजक्त....जमल तर सांग एकदा काळाला ...माझ्यासाठी...थोडं माग सरण्यासाठी....अन हो तुझ्या हृदयालासुद्धा....एकदा मला ' प्रपोज ' करण्यासाठी.....होईल का रे असे? नाही होणार आता...खंर तर बरेच प्रश्न उभे करून केली तुझी कवितापण उत्तर शोधण्याची वेळ अन वय मागे पडलंय.
तुझी झालेली
शालिनी
5:21am Dec 8
प्रिय शाले(सलदे ना?),
का कुना गायी...माला पयल्यापासून तुओघाबरोस वाट्यासो. तुला का वाटेदे ? तूका विसार करदा?तुला आवडदे गानाय? तू काबोलदा? अह्या प्रश्नातूस गुरफटलो ऱ्यासो आन त्यात तुमश्या घरायी पायरी उश्शी आहासमाला वाट्यासा. आतेपान मा कादोडी कवितेला मराठीत उत्तर देओनतू त्या विसाराला खपूसघायला, मे मात्री मायीपायरी धरोन कादोडीतुस लीविते लो..तुला समजेदे ना? (आतेतरी)
तू पेन्सिली गिरमिटसा नावकाडला त्योरने आठवाला, पेन्सिल वापऱ्या लागल्यापासूनजोड्यो पेन्सिली वापरल्यो नायद्यात त्या चोब्बल पेन्सिली नव्वी वहरावापरल्यो. दुकानवली लुजानबाय हांग्याशी, 'पोरा तू पेन्सिली गिळता गाका?' आते त्यापेन्सिली टोकाई आठोन तुला टोसाते पानत्यास पेन्सिली टोकाये कते मा मनाला कुतकुल्यो होयाश्यो...
हा बदामोरने आठवाला, त्याबामना दापुडशे बदामे पाडले भगून खालेल्यो घानेड्यो गाळी...३०-३५ बदामातने तुकरता १० बदामे निवडताना काडल्यालो अरदोतास, ते ताजेरेले पात भगूनहप्पे रात आमश्या पडाळा कौलोर ठोयलते हा...ताजे होते गा?
मावशी हेनकळीमेरे उबी रेओन तुलाबगीताना मेरश्या हेनाव वास कते आलोसनाय, पान तूआत्ते आठोन काडली तेखोल्यात जॉक्कोन बांदिलेली पुडी होडली गाकागड्या कळ्यो कह्यो उफळात्यात ताहा त्या आठवनीये मामन जहनी फुलयला....त्यानंतर बँगलोरश्या कागड्याने वसयसो कागडो मारलो खरोपान मा मनात'त्या'कागड्या वास जोहोच्चे तोहोहाय.
आन हा तोपाहाळ्या दी कोहो बाहेने....तुलाहत्री दिलीन मे भिजात गेलोआन त्या नंतरजॉ हकम जालो.....वायलो शा डॉक्टरसा इंदिशन अजूनदुखाते लो....पन तुलामयती हाय गा?तू हत्री परतदेताना एका काडीआ हुततुटलोता त्याला मा दादीने कागड्या तांबड्या हुताये टाकोमारलोतो तो मे तिआसोरे तोडलो आनत्यानंतरशे बरेस पाहाळे त्यामोडक्या हत्रीत तू आठवनीत भिजोन काडले.....
तू सायकली चेयीन घालोन देताना तूमाये माखलेले हाथबगीले पान मा बोटेत्या चेयनीत शेसलोते तेलपविता-लपविता मा टुमन मात्री आख्खी माखलोती...
आते भर-भरोनलीविते ला पान तीगाळश्यो त्योअव्यक्त भावना आन तू दिखली पाभगून केलेली धडपडमाला अजून हळवाकरते........