Tuesday, July 10, 2012

माझे हरवलेले बालपण

कुठे हरवला तो काळ्या , कुठे हरवला तो पांडू

कुठे हरवली ती विटी, कुठे हरवला तो दांडू



कुठे हरवला तो ओटा, कुठे हरवला तो झोपाळा

कुठे हरवली ती पाटी, कुठे हरवली ती शाळा



कुठे हरवले ते लुगडे, कुठे हरवले ते पोन्या

कुठे हरवले ते भोवरे, कुठे हरवल्या त्या चिन्या



कुठे हरवल्या त्या चिमण्या, कुठे हरवले ते कावळे

कुठे हरवल्या त्या चिंचा, कुठे हरवले ते आवळे



कुठे हरवले ते बैल, कुठे हरवला तो रहाट

कुठे हरवला तो चांदोमामा, कुठे हरवली ती पहाट



कुठे हरवली ती शेती, कुठे हरवली ती वाडी

कुठे हरवले ते ताड -गोळे, कुठे हरवली ती ताडी



कुठे हरवले ते मामा, कुठे हरवली ती बाय

कुठे हरवले ते बाबा, कुठे हरवली म्हातारी बय



कुठे नेवू मी Laptop, कुठे नेवू मी Mobile

माझे हरवलेले बालपण , मला कोण आणून देईल?

                                    सचिन


No comments: