तू कोण मला माहित नाही....
माहित नाही तुझ नाव, अन तुझ गाव....
तसा मला तुझ्या वेदनेत हि नाही इंटरेस्ट!
पण सगळेच लागले होते संस्कृती रक्षणा मागे ....
आपला समाज...आपली संस्कृती वैगरे वैगरे...
मग मीहि ठोकून दिल्या माझ्या प्रतिक्रिया अन सामील जालो संस्कृती रक्षकात....
कमेंट वर कमेंट वाढत गेली.....
प्रत्येक संस्कृती रक्षकाच अस्तित्व दाखवत गेली.....
दिसली ती बेगडी संवेदना .....
तुझी वेदना कुठे दिसली नाही...
पोस्ट मागे
पोस्ट येत गेल्या तुझी गोष्ट सांगत गेल्या....
नेहमीप्रमाणे संध्याकाळ झाली.....
पोस्ट विझून गेल्या.....
जळत राहिली ती फक्त ...तुझी न कळलेली प्रेमकहाणी !
No comments:
Post a Comment