Friday, November 1, 2013

ठेचून काढायला पाहिजे तुम्हाला....

तो असतो कुठे तरी दबा धरून आपल्यात….वासनेने भरलेला…
एकट्या देहाला शोधित …निष्पाप शरीराला भोगण्यासाठी….
त्याला नाही कळत नाती….आई, बहीण , मुलगी …कशा कशाचीच 
तो जाणतो फक्त देह मादीचा…क्षणभरच्या संभोग सुखसठी…

तो असतो कुठे तरी दबा धरून आपल्यात….रेलवे स्टेशन वर आपल्यात चालणारा…
हळूच निष्पाप शरीराला कीळसपणे स्पर्शून जाणारा..
कधी तो असतो ओफिस मधे …. सुटात बुटात सजलेला…
आपल्या वाईट नजरेने तिला अस्वस्थ करणारा…

तो कधी बनवतो टोळी…त्याच्या सारख्या राक्षसांची….
माणसांचे बुरखे घालून मुक्तपणे हिंडणारी…
तो तुटून पडतो एखाद्या निष्पाप जिवावर... 
तिच्या एकांताचा फायदा घेऊन…अन करतो रानटी स्वैराचार…
अन नष्ट करतो पुरावा त्या देहासकट…

अरे लांडग्यानो, उगाच समजतो आम्ही तुम्हाला मानव....
तुम्ही तर हिस्त्र श्वापदे ...लपून बसलेली आमच्यात...
वेचून काढायला पाहिजे तुम्हाला....ठेचून काढायला पाहिजे तुम्हाला....
नको आम्हाला असले षंढ पुरूष...वासनेचे भुकेले....भोगासाठी आसुरलेले 
वेचून काढायला पाहिजे तुम्हाला....ठेचून काढायला पाहिजे तुम्हाला....

असाल मर्द तर या रस्त्यावर....लक्ख प्रकाशात....
जगाच्या समोर चेहरा दाखवत.....
खात्री देतो तुम्हाला.....उरणार नाही तुमचे लिंग... 
निष्पाप देहाला भोगण्यासाठी…वेगळे केले जाईल शरीरापासून......
इतर जंगली लांडग्याना सबक देण्यासाठी.....!!

सचिन

No comments: