चिंब भिजलेले डोळे तुझे …
पावसाला काही सांगत होते …
तुझ्या सुकलेल्या देहावर
दोन थेंब मांगत होते ..
पाऊस तोः अल्लड …मग तुझ्या डोळ्यातून कोसळू
लागला
सुकलेल्या देहाला तुझ्या, चिंब चिंब सतवू लागला ..
तुझ्या डोळ्यातून कोसळणारा पाऊस अन ओलाचिंब
तुझा देह ….
अडकलेले माझे पाऊल …हा कसला तुझा मोह …
तू ये …पाऊस घेवून कवेत …आभाळ बनून ये ..
कोसळत जा माझ्यावर …थेंब थेंब …टप टप …ओघळत जा माझ्या
सर्वांगावरून …
पाऊस स्पर्श देऊन जा …मला ‘आतून-बाहेरून’ भिजवून
जा ..
No comments:
Post a Comment