रस्त्यात भेटलेले रस्ते …अनोळखी असून ओळखीचे
बोलण्यात होतात मोकळे … आणि होतात रस्ते सवयीचे …
सुरु होतात संवाद आणि जाणवतात रस्ते आपले …
प्रवाशांना सामावून घेणारे … भावनांना सोबत करणारे …
प्रवाशालाही पडतो रस्ता अंगवळणी …अन रस्त्यालाही प्रवासी …
कधी होतात गप्पा इथल्या …..कधी
तिथल्या गप्पा काही …
तसा प्रवाशालाही माहित असते …हे रस्ते नाही आपल्या
मालकीचे
हे क्षणभराचे सोबती … नाही कायमचे हे आपुले..
रस्त्यालाच भारी चिंता ….प्रवाशांच्या अतिक्रमणाची …
त्यांच्या भाव -भावना न जाणता …त्यांच्याच वाटा थांबवणारी …
तसं, रस्त्याने बंद केली वाट …म्हणून प्रवासी काही थांबत
नसतात …
दुसरा रस्ता शोधून …तेही प्रस्थान करतात …
शेवटी , रस्ते आणि प्रवासी …दोघानाही वाहायचे असते …
एकमेकांना साथ देवून ….आनंदित राहायचे असते …
No comments:
Post a Comment