'रंग माझा आहे कुपारी' !!
शब्दाला जेव्हा सुरांची साथ मिळते तेव्हा जन्म घेते ते गीत. जुन्या काळी आपल्या कुपारी मातीत अनेक गीतांचा जन्म झालेला आहे, पण अलीकडच्या काळात नवीन गीतांची निर्मिती थांबलेली आहे. दुर्दैवाने नवीन पिढीला भावतील अशी गीते सध्या कानावर पडत नाहीत. आपल्या समाजात अनेक उभरते लेखक-कवी आहेत तसेच उच्च प्रतिभा असलेले तरुण संगीतकार अन गायक सुद्धा आहेत. ह्या सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास कुपारी मातीचा संगीतमय वारसा आपल्याला पुढे नेता येईल. एक सुरुवात म्हणून मी आणि Anson A. Tuscano ह्याने तरुण पिढीला आवडेल अशा एका गीताची निर्मिती केलेली आहे. मला सहज सुचलेल्या ओळीवर Anson ह्याने सुरेख संगीत देऊन आपल्या दमदार आवाजात ह्या गाण्याला जिवंत केले आहे. संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या प्रतिभावान तरुण मंडळीना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे अन ह्या प्रयत्नात आपल्या सर्वांची साथ आपल्या होतकरू तरुण मंडळीना हवी आहे. 'रंग माझा आहे कुपारी' ह्या गीताला संगीत देण्यासाठी Anson ह्याने भरपूर मेहनत घेतली आहे. ह्यात कुपारी मातीचा गोडवा आहे, तसेच आपल्या पारंपारिक वाद्यांचा तडकाही आहे. हे गीत रेकॉर्ड करीत असताना शेवटच्या कडव्यात खूप रंग पेरण्यात आले आहेत, जेणेकरून ऐकताना आपल्याला नाचण्याचा मोह होईल. हे गीत बनवण्यसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे त्या सर्वांचे आभार. हे गीत आपण यु ट्यूब वरून किव्हा http://www.onevasai.com/ येथून डाऊनलोड करू शकता. आपल्याला हे गीत आवडल्यास आपल्या मित्रांशी शेअर करा. https://www.youtube.com/watch?
|
Thursday, January 1, 2015
'रंग माझा आहे कुपारी' !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment