मेहनत करे कुपारी, मलई खाये भैय्या !!
माझ्या काकांचे घर मुख्य रस्त्यावर आहे. त्यांच्या अंगणात कमी उंचीची चार पाच नारळाची झाडे आहेत. त्या दिवशी नारळ विकत घेणारा एक भैय्या त्यांच्या घरी आला अन १० रुपयाप्रमाणे सौदा केला. त्याने बरोबर आणलेल्या व्यक्तीने २० मिनिटात त्या चार पाच झाडावरून ६-७ पेंडी खाली उतरवल्या अन रस्त्याच्या कडेला ठेवल्या. त्यात जवळपास ४० नारळ होते. त्यावेळी रस्त्यावरून जाणारी एक सफेद होंडा सिटी कार काकांच्या अंगणात थांबली. त्यात बसलेल्या ३ तरुणांपैकी एकाने नारळाचा भाव विचारला. काका काही बोलण्याअगोदर त्या भैय्याने त्या तरुणाला एका नारळाचे प्रती २५ रुपये सांगितले. तरुण म्हणाला 'ठीक आहे, सर्व नारळ गाडीच्या डीगीत टाका'. त्या भैय्याने त्या ६-७ पेंडी होंडा सिटी कारच्या डीगीत टाकल्या अन त्या तरुणाकडून प्रती २५ रुपये मोजून घेतले. कार निघून गेली अन त्या व्यक्तीने काकाच्या हातात त्या तरुणाने दिलेल्या पैशातून १० रुपये प्रमाणे नोटा ठेवल्या. काकांचे नारळ, काकांच्या अंगणात, काकांच्या डोळ्यासमोर एका भैय्याला काकांपेक्षा जास्त नफा मिळवून देऊन गेले होते. दुर्दैव हे कि आपल्या शेतीमालासाठी बाजारपेठ आपल्या आजूबाजूला उपलब्ध असताना आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही, अन अगदी थोड्या श्रमाने परप्रांतीय लोक आपल्या मेहनतीवर गब्बर होतात. आपल्या गावातील बेरोजगार तरुण ह्या संधीचा फायदा घेऊ शकतील का? कोवळे नारळ, केळी, पपई अन इतर भाजीपाल्याला आज आजूबाजूच्या मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो, परंतु आपल्याला आपल्याच गावात हा माल विकण्याची 'लाज' सोडावी लागेल. |
Thursday, January 1, 2015
मेहनत करे कुपारी, मलई खाये भैय्या !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment