Wednesday, March 9, 2011

आई, आम्हाला जगायचं होत.

Poem written on Mumbai Mirror Headline dated 08March 2011
Malad woman kills self, kids


आई, आम्हाला तू का मारलस? का ढकलून दिले टेरेस वरून?
आई, आम्हाला जगायचं होत. शाळेत जायच होत....हे विश्व पाहायचं होत.
आई, तू आमची जीवनयात्रा का संपवलीस?
आई, आजी जो ड्रेस आणला होता.. तो मला घालायचा होता उद्या..
रोहनदादाच्या वाढदिवसाला...पण आई....आता मी कधी घालू तो ड्रेस?
आई, खाली कोसळताना आम्हाला प्रचंड भीती वाटली.....
वाटल स्पायडरम्यान येईल आणि अलगद हातावर झेलून आम्हाल वाचवेल
पण पण आई, ....... स्पायडरम्यान आलाच नाही...
आई, सांग न..स्पायडरम्यान का आला नाही?
आई, जेव्हा आम्ही खाली आपटलो..प्रचंड लागले क्षणभर.......
नंतर नंतर काही कळलेच नाही....आई...आई...नंतर नंतर काही कळलेच नाही..
आई, आम्हाला तू का मारलस? का ढकलून दिले टेरेस वरून?
आई, आम्हाला जगायचं होत. शाळेत जायच होत....हे विश्व पाहायचं होत.
आई, तू आमची जीवनयात्रा का संपवलीस?
आई, काल शाळेतल्या आयुषचा खोडरबर चुकून माझ्या दप्तरात राहिलंय...
त्याला आज तो परत करायचा होता....
आई, त्याला वाटेल का ग कि मी खोडरबर चोरून देवबाप्पा कडे पळून गेलो?
आई, टेरेस वर राहिलेल्या दप्तरातला खोडरबर त्याला परत करशील का?
आई, सर्व मुलांच्या आई टेरेस वर नेऊन अशाच फेकून देतात का आपल्या मुलांना?
सांग न आई? सर्व मुलांच्या आई टेरेस वर नेऊन अशाच फेकून देतात का आपल्या मुलांना?
आई, आम्हाला तुझी आठवण येते... बोलाव ना परत आम्हाला टेरेस वर.....