Tuesday, November 6, 2012

झोपाळ्यात बसले


झोपाळ्यात बसले , बाबा अन बय ...!!
लेकरू तीच मिठीत, देई ममता ती स्वर्गीय..!!

बय लेकराची, त्याला गाई अंगाई गीत..!!
धनी तिचा जीवलगा, फुले झोपाळ्यावर प्रीत..!!

राब राबती जीव, दिवसभर हे उन्हात...!!
झोपाल्यावरची झुळुक, विसावा देती त्यासं क्षणात...!!

कंदील पेटती, उजळी अंगण अन ओटा...!!
संसार त्यांचा फटका, पण सुखास नाही तोटा..!!

पाठीला उभी म्हैस, जणू रक्ताची बहीण...!!
दूध देवूनी तिचे, करी संसाराला मदत...!!

केली छातीची माती, अन उभा केला समाज..!!
आज सगळच ग्लोबल, नाही बय-बाबाचा आवाज ..!!

निघून गेले ते दिवस, नाही उरले मागे बाबा-बय...!!
आली दारी श्रीमंती फार, पण सुखशांती घरात नाय....!!!