Tuesday, September 13, 2011

अजून कळले नाही......

अजून कळले नाही......



मुला-सुना सारखे मज कुणी छळंले नाही!

का ठेवले मागे मजला अजून कळले नाही!


ती गेली निघुनी एकटी मजला मागे सोडूनी,

भोगतो मरणयातना आज, आधार कुणाचा नाही!

तिचे जाने देवा, का तेव्हा टळले नाही,

का ठेवले मागे मजला अजून कळले नाही!



मी पोरका एकटा, सोसतो तिच्या विना,

माझ्याच घरकुलात रडतो लाचार क्षणा क्षणा,

माझ्या म्हातारपणाचे ओझे मलाच कळले नाही,

का ठेवले मागे मजला अजून कळले नाही!


ज्या पुत्रास मी वाढविले ते माझे कधी न झाले,

पत्नीच्या पदरा आड मजला विसरून गेले!

या अजीब जीवनाचे फासे मज कळले नाही,

का ठेवले मागे मजला अजून कळले नाही!


भेटेल जेव्हा तिला कसे प्रेमगीत गाऊ?

कसे नाडले आपल्यांनी उत्तर कसे मी देऊ?

आपल्याच बापाशी त्यांचे नाते जुळले नाही,

का ठेवले मागे मजला अजून कळले नाही!



घे बोलवुनी सखे मजला आता तुझ्याकडे,

घुसमट होते माझी आपल्याच नात्यामध्ये,

माझ्या यातनात त्यांचे डोळे निथळले नाही,

का ठेवले मागे मजला अजून कळले नाही!



सचिन मेंडीस