Thursday, July 12, 2012

"कुत्तो कि मौत '



·         'संवेदना' हरवलेल्या माणसांसाठी एक कविता...

आज सकाळी, कुत्र्याच एक पिल्लू ...
दृष्टीस पडल ..रस्त्यात पडलेलं निपचीत ....
... कुणाच्या तरी गाडीखाली आलेलं......
माणसाच्या स्पर्धेत जीव गमावून बसलेल ....

पिल्लू कुत्र्याच म्हणून ...बेवारस ...बेदखल ..
नाही कुणाची गाडी थांबलेली त्यासाठी ...
नाही कुणाची धावपळ 'संजीवनी ' देण्यासाठी ...

ते नव्हते कोणत्या समाजाचे ..ना कोणत्या जातीचे ...
ना होते कुणा पक्षाचे कार्यकर्ते ...

ट्रेन मध्ये -हि नाही चर्चा ...अमुक गावचा गाडीवरून पडला ....
ह्याचा जावई...त्याचा मावसभाऊ वैगरे वैगरे ....

गाडी मागून गाडी जात होती ...
त्याच्या अचेतन देहाला शिन्न -विशिन्न करीत .....

एक कुत्री ...पडत्या पावसात ...हुंगत होती त्याला ...
आई असावी बहुतेक ....तिच्या आरोळ्या... तिचे अश्रू ....
माणसाच्या गोंगाटात मागे पडले होते ....

आज संध्याकाळी ... 'may be' शिल्लक असतील त्याच्या शरीराचे अवशेष ...
मूळ देह... पसरला असेल हजोरो गाड्याच्या चाकाला चिकटून ....ह्या निर्दयी शहरात....

बिच्चार पिल्लू ...'कुत्र्याच' जीण जगलेल ...
'संवेदना' हरवलेल्या जगात "कुत्तो कि मौत ' मेलेलं ....RIP.