Tuesday, November 17, 2009

सलाम


सलाम समस्त स्वाभिमानी वसई कर जनतेला सलाम ................ सलाम
निवडणुकीत लाचार न झालेल्याना सलाम ................
सलाम
बिर्यानीवर थुंकलेल्याना सलाम, दारूला लाथ मारलेल्याना सलाम ................
सलाम
सर्वा राजकीय पॅक्षाना एकत्र आणणा
र्‍या तरुणाना सलाम ................
सलाम
रस्त्यावर उतरलेल्या महिलाना सलाम ................
सलाम
बॅनर
लावणार्या बाळगोपाला ना सलाम ................
सलाम
काठी टेकवत मतदान
करणार्‍या आजी-आजोबा ना सलाम................
सलाम
वडा पावावरती पूर्ण रॅली फिरणार्‍याणा सलाम................
सलाम
खिशातले संपवून प्रचार करणार्‍याणा सलाम................

सलाम

भाऊला सलाम,
श्यामला सलाम, मिलिंदला सलाम,माइकल व विजय ला सलाम................
सलाम
त्यांच्या बूथ
वर बसून भाऊला
मत देणार्‍याणा सलाम ................
सलाम

येशुला सलाम, प्रभूरामाना सलाम, अल्लाला सलाम
सलाम
कॉंग्रेस, जनता दल, मनसे, शिवसेना
एकी ला सलाम................
सलाम सलाम
सलाम
शेवटी वसई च्या मातीला सलाम,
क्रांती दिनाच्या वाघोली राती ला सलाम................

सलाम

सचिन मैडिस

Abhang Vijayache...

जनतेचा जोर I उभे राहीले आंदोलन I
शहारले लोकमन I परिवर्तनासाठी I
वृद्ध आणि पोर I महिला रस्त्यावर I
अचंबित शहर I आले सोबतीला I
उभा जरी दगड I येईल निवडूनी I
गर्जना करी धनी I निवडणुकी पुर्वीI
वाघोलीची रात्र I तिला नाही तोड I
तिथच आडल घोड I विजयाच I
पुढे झाले तरुण I दिला स्वाभिमाणाचा मंत्र I
आले सर्व पक्ष एकत्र I लढाईसाठी I
साड्यांचे आमिश I वाटल्या बघ नोटा I
प्रचार सारा खोटा I विरोधकांचा I
मतदानाचा दिन I विक्रमी मतदान I
वसई चे प्राण I वाचवाया I
वसई च्या लढाईत I चारी मुंड्या चीत I
झाले पानिपत I विरोधकाचे I
वसई करानो आता I विसरा पक्ष जातपात
विरोधकावर मात I करू कायमचीच I

सचिन मैडिस