जनतेचा जोर I उभे राहीले आंदोलन I
शहारले लोकमन I परिवर्तनासाठी I
वृद्ध आणि पोर I महिला रस्त्यावर I
अचंबित शहर I आले सोबतीला I
उभा जरी दगड I येईल निवडूनी I
गर्जना करी धनी I निवडणुकी पुर्वीI
वाघोलीची रात्र I तिला नाही तोड I
तिथच आडल घोड I विजयाच I
पुढे झाले तरुण I दिला स्वाभिमाणाचा मंत्र I
आले सर्व पक्ष एकत्र I लढाईसाठी I
साड्यांचे आमिश I वाटल्या बघ नोटा I
प्रचार सारा खोटा I विरोधकांचा I
मतदानाचा दिन I विक्रमी मतदान I
वसई चे प्राण I वाचवाया I
वसई च्या लढाईत I चारी मुंड्या चीत I
झाले पानिपत I विरोधकाचे I
वसई करानो आता I विसरा पक्ष जातपात
विरोधकावर मात I करू कायमचीच I
सचिन मैडिस
No comments:
Post a Comment