Monday, July 9, 2012

Ani Kumpanach shet khat hote....

Tree talking to us!


रस्त्यात भेटलेले रस्ते


रस्त्यात भेटलेले रस्ते अनोळखी असून ओळखीचे

बोलण्यात होतात मोकळे आणि होतात रस्ते सवयीचे



सुरु होतात संवाद आणि जाणवतात रस्ते आपले

प्रवाशांना सामावून घेणारे भावनांना सोबत करणारे



प्रवाशालाही पडतो रस्ता अंगवळणी अन रस्त्यालाही प्रवासी

कधी होतात गप्पा इथल्या …..कधी तिथल्या गप्पा काही



तसा प्रवाशालाही माहित असते हे रस्ते नाही आपल्या मालकीचे

हे क्षणभराचे सोबती नाही कायमचे हे आपुले..



रस्त्यालाच भारी चिंता ….प्रवाशांच्या अतिक्रमणाची

त्यांच्या भाव -भावना न जाणता त्यांच्याच वाटा थांबवणारी



तसं, रस्त्याने बंद केली वाट म्हणून प्रवासी काही थांबत नसतात

दुसरा रस्ता शोधून तेही प्रस्थान करतात



शेवटी , रस्ते आणि प्रवासी दोघानाही वाहायचे असते

एकमेकांना साथ देवून ….आनंदित राहायचे असते

खिमा-वडे बंड्याचे





वड्यात वडे I खिमा-वडे बंड्याचे I

आवडीने खायचे I सकलांनी I

असे नंदाखाल नगरी I सण आणि सोहळा I

लहान थोर गोळा I खावया वडे I

गरम -गरम वडे I वरून टाका विनेगर I

लागे रुचकर I वडापाव भारी I

राजोडी किनारी I निघते बघ जोडी I

खिमा वड्याची पुडी I टाके डिगी-मधी I

दुकाना मागे I तिथे ठेवलेली खाट I

M .M. चा थाट I जणू तिचा I

बंड्याचे दुकान I जणू कॉलेज-चा कट्टा I

पोरा-पोरी ची थट्टा I चाले तिथे I

कितीने केली I खिमा-वड्याची कॉपी I

गेली रेसीपी I फ्लॉप त्यांची I

बंड्याचे वडे I कुपाऱ्यांचा प्राण I

टिको त्याची शान I वर्षो-वर्षी I


सचिन

चिंब भिजलेले डोळे तुझे …




चिंब भिजलेले डोळे तुझे
पावसाला काही सांगत होते

तुझ्या सुकलेल्या देहावर
दोन थेंब मांगत होते ..

पाऊस तोः अल्लड मग तुझ्या डोळ्यातून कोसळू लागला
सुकलेल्या देहाला तुझ्या, चिंब चिंब सतवू लागला ..

तुझ्या डोळ्यातून कोसळणारा पाऊस अन ओलाचिंब तुझा देह ….
अडकलेले माझे पाऊल हा कसला तुझा मोह

तू ये पाऊस घेवून कवेत आभाळ बनून ये ..
कोसळत जा माझ्यावर थेंब थेंब टप टप ओघळत जा माझ्या सर्वांगावरून
पाऊस स्पर्श देऊन जा मला आतून-बाहेरूनभिजवून जा ..

कोंबड्या चढल्या ह्या फांद्यावरी




सूर्य विझला ह्या सायंकाळी …
कोंबड्या चढल्या ह्या फांद्यावरी! …

... वाट पाहती ह्यांचे ‘कपिरे’ ..
गाव शोधती ..डोळे म्हातारे! ..

आभाळातील टिपती मोहक चांदणे
फुटाच्या खोलीत असह्य जिने!

दुरून कोंबडी ‘खोपा’ भासे
बोडके झाड सुंदर दिसे!

आज मनाचे आपण केले पिंजरे
आपल्याच दुनियेत आनंदी सारे!

नका करू मनास बंदिस्त
निसर्गाच्या फांदीवर जगा स्वछंद!