वसईच्या मातीला आज .....
परिवर्तनाच्या पावसाचा मनोमनी गारवा आहे.
वसईच्या मातीला आज, गंध बघा नवा आहे.
पहा पावसाची सर येतंय, घेवून नवा थेंब
दहशतीच्या भेगामधून, जन्मतोय नवा कोंब
प्रत्येक थेम्बातून कोंब जगवण्याचा पावसाचा दावा आहे.
वसईच्या मातीला आज, गंध बघा नवा आहे.
पहा तरुणाईची वीज लखलखतेय, वसईच्या आकाशात
अवघी वसई उजळून निघतेय स्वातंत्र्याच्या प्रकाशात
नव्या तरुणाईचा नवा प्रकाश, वसईला आज हवा आहे.
वसईच्या मातीला आज, गंध बघा नवा आहे.
पहा पूर्वेच्या डोंगरावर झाली, झाडे-पाने ओलीचिंब
पश्चिमेच्या लाटांवर पडतेय नव्या आकाशाचे प्रतिबिंब
उजळलेल्या आकाशात आज, निर्भीड पाखरांचा थवा आहे.
वसईच्या मातीला आज, गंध बघा नवा आहे.
बघ वीस वर्षाची तहान, भागवतेय वसईची माती,
कोसळते डोळ्यातून पाणी, माझी भरून येतेय छाती,
माझ्या डोळ्यातून कोसळणाऱ्या पावसाला पुण्याईचा ठेवा आहे.
वसईच्या मातीला आज, गंध बघा नवा आहे.
वसईच्या मातीला आज, गंध बघा नवा आहे.
सचिन मेंडिस
1 comment:
I just loved it......
Post a Comment