Sunday, September 26, 2010

सीताराम पांडू गावंडा



जव्हार येथील ३२ वर्षीय सीताराम पांडू गावंडा ह्या युवकाने गरिबीमुळे आपल्या आजारी कुटुंबियांची होणारी परवड व सरकारी यंत्रणेकडून होणारी उपेक्षा ह्यामुळे हतबल होवून दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली. वसईचे आमदार विवेकभाऊ पंडित ह्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून तेथील एकंदर परिस्थिती नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेला SMS खाली देत आहे .... मन हेलावून टाकणारा...तितकाच स्वंतंत्र भारतातील लाल फितीच्या कारभारावर ताशेरे ओढणारा .......



सीताराम पांडू गावंडा , वय वर्षे ३२,
राहणार स्वतंत्र भारत,
पण ज्यांचा मला गळफास लावतानाही सार्थ अभिमान होता.
हे माझ्या स्वतंत्र भारता, मला तुझा अभिमान आहे कारण तू मला मुभा दिलीस मूक आत्महत्येची.....
आणि माझ्या आजारी पत्नी आणि मुलीचे अश्रू गोठवण्या आधीच ...........
तू लाल फितीत माझ्या मृत्यूनंतरही मुसक्या आवळलयास........
त्या गळफासाने जितका मी गुदमरलो नाही,.....
तितका माझा श्वास कोंडला, माझ्या मृत्यूचा खोटा पंचनामा करणाऱ्या त्या सरकारी फायलीत.................
हे लाडक्या स्वंतंत्र भारता, मला अभिमान आहे तुझा.......
कारण तू मला आयुष्यभर चार घास जरी देवू शकला नाहीस..... पण फुकट मरण दिलेस....
पण हे माझ्या स्वंतंत्र भारता,
तुला माहितेय, त्या गळफासावर अधांतरी लटकलेले कलेवर....
ते माझ नव्हतंच......
तिथे तर हे भारता, तू गळफासावर लटकत होतास....
स्वातंत्र्याची लक्तरे पांघरून........


आमदार विवेकभाऊ पंडित

No comments: