Thursday, December 13, 2012

बोकड

नातेवाईकांच्या लग्नात मिळाला मान...

‘मटण’ आणण्याचा...

मान कसला...सन्मानाच्या वेष्टनात लपेटलेली 'हमालीच' ती...

अर्धा तास पारखत होतो बोकड.... कापण्याआधी...

तसं आपल्याला सिलेक्शनचा गंधच नाही...

'माणस' पारखता येत नाही तर बोकड कसले....

का कुणास ठाऊक वाटल आपण हि क्षणभर आहोत ज्योतिषी...

जिवंत जीवाचे भविष्य सांगणारे...

कारण माहिती होत मला त्या बोकडाच आयुष्य....भविष्य....क्षणभराच ....

तासभरात होणार होते त्याच्या जिवंत शरीराचे....सो कॉल्ड 'पिसेस'....

संध्याकाळी प्लेटमध्ये सजण्यासाठी

उजव्या बाजूला उभा असणाऱ्या ह्या बोकडाचा पाठीचा तुकडा...

कुणाच्या बरे प्लेटमध्ये येणार असेल....

गावातल्या कुणाच्या...कि मित्राच्या...

कुठे असेल तो आता...?

ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करत असेल का?

कि अहेराची वही चाळत असेल संध्याकाळचे एन्वेलेप भरण्यासाठी....

किती विचित्र विचार ह्या वेळी....

ते सुद्धा ह्या मानाच्या कामात...

छे ..छे ...राहून दे...जाऊ दे असे विचार...

'शेख, मटण अच्छा देना .... चरबी निकाल दे.....खा खा के बहोत चरबी चडी है लोगो को '...

No comments: