Friday, November 1, 2013

3 Nights..



सल, ५०० रुपय काड”..... नेल्सननॅ डेनिसला हांगीला..... नेल्सन पैज जिकलॉतॉ..... पैज कुहनी? गावश्या बार जी हिंदू लॉकायी स्मशानभूमी होती तडे राती एक वाजता जावॉन चॉकनॅ नाव लीवॉन यासा... नेल्सननॅ काल राती जावॉन ता करॉन दाखडलोता..... नेल्सन मंजे बो डेरिंगबाज माहनू... रात, काळोख, भूतप्रेत... घाबरॉ मंजे त्याला कय माइतूस नाय...

गावश्या पोरायी ठरविला याला आपल्या एरिया मिनश्या सगळ्यात डेंजर स्पॉट ला धाडयासा....पैज पन भोटी... नेल्सन नॅ चॅलेंज कबुल केला... लागोपाठ तीन राती..... एक वाजता... एकट्यानॅ हातात बॅटरी वैगेरे कय न घेता... तिनी स्पॉट ला जावॉन यासा. ... आन सबूत मनून तडे कयतरी ठवॉन यासा किंवा तडसा कयतरी घॅवॉन यासा... बक्षिस पन जबरदस.. पयल्या दिहा १००००, दुहर्या दिहा १५००० आन तिहर्या दिहा २५००० रुपय... स्पॉट पन नक्की जालतॅ.. पयल्या दिहा गास-डोंगरी श्या आदिवाशी पाडयाशी बाव.... दुहर्या० दिहा घॉहाळी-नाळ्या रोडश्या बाजू सॉ राट... आन तिहरा बोळींज-नानभाट रोडवरश्या गोळप्यासॉ ताड...

आज पयली रात....नेल्सन ला गास-डोंगरीश्या आदिवाशी पाडयात जासा हॉता. कय वहरा अगोदर तडश्या बायीत होळी दिहा एक २१ वहरायी पोरी पडॉन मेलती. हांगात्यात की तिया हाताला ६—६ मंजे १२ बोटे होतॅ.. होळी दिहा तिने दोन्नी हात ऑइल पेंटनॅ रंगविलतॅ.. ६—६ बोटाये २ पंजॅ.. बायी आ भितीओर अजून दिखात्यात.. ती बायीत पडली ती नंतर वर आलीस नाय. ती पोरी राती एक वाजता त्या बायीओर उतरातॅ आहा हांगात्यात.. “नेल्सन निंग्यासा रॅ”, डेनिस आन गावश्या पोरायी विसारला.. नेल्सन रेडी झालॉ.. भिगावश्या फाटयोर सगळे राती पावने एकला पोसले. डेनिसनॅ गाडीतनॅ लाल ऑइल पेंटसॉ डबॉ काडलॉ आन नेल्सनश्या हाताला लावीलॉ... “जाय नेल्सन, जाय आन त्या बायी वरती जे त्या पोरीये पंजॅ हात त्याला तुये पंजॅ लावॉन ये.. हाकोटे आमाला सबूत मिळदॅ.... नेल्सन निंगालॉ... त्याला कडसॉ आलतॉ घाबरॉ... १५ मिनिटात त्या हाताये पंजॅ त्या बायीवरश्या पंजाला चिकटवॉन आलॉ.. दुहर्याा दिहा हाकोटे डेनिसनॅ जावॉन कन्फर्म केला. नेल्सननॅ १०००० शी कमाई केलती... 

आज दुहरी रात.. घॉहाळी होडला आन नाळ्याकरता निगाले गा बामन पडाई याश्या अगोदर डाव्या बाजूला एक पायवाट लागातॅ.. तडे एक जूनॉ राट हाय.. तडे एका बामना बायकूनॅ जीव दिलतॉ, “सावित्री” नाव तीआ.. कुन हांगात्यात तिला मारॉन टाकील्ता तडॅ...तर ती सावित्री राती उतरातॅ तडॅ.. कय लोकांयी तीयॉ आवाज पन आइकिलॅ आहा बोलात्यात... हांगात्यात, ती बोलातॅ “मॅ...मॅ सावित्री, माये पोरे कडॅ हात. बारक्याला दूध पाज्यासा हाय आतॅ”... “नेल्सन निघ्यासा रॅ” डेनिस आन गावश्या पोरायी विसारला.. नेल्सन रेडी झालॉ.. राती पावनेएक ला नाळयाआ क्रॉसवर येवॉन सगळे थांबले... “नेल्सन, ओ घॅ चॉक, तडॅ पॉसलॉ गा राटाआ खांबोर १०१ नंबर लीवॉन यासा... सबुत मनून... नेल्सन निंगालॉ... त्याला कडसॉ आलतॉ घाबरॉ... १५ मिनिटात तो राटोर जावॉन चॉकनॅ खांबोर १०१ नंबर लीवॉन आलॉ... दुहर्या दिहा हाकोटे डेनिसनॅ जावॉन कन्फर्म केला. नेल्सननॅ १५००० शी कमाई केलती...

आजशी तीहरी रात.. बोळींज चर्च होडला गा नानभाट रोडला गॉळपा एक भाट... ताडीऑ पट्टॉ मनून फेमस... गेल्या वहारा एक भंडारी तडॅ ताडोरनॅ पडॉन मॅल्तॉ... जुना पिंपळा झाड हाय त्या बाजूसॉ ताड... जाम विचित्र आन भयानक मरान आल्ता त्याला... ताडा बुडोर डॉखा आपटॉन आख्खा ताडाआ बुड रक्ताये माखलॉता...आन दोनी पाय मॉडॉन उलटॅ जालतॅ... लोक हांगात्यात की तॉ भंडारी राती एक वाजता तडॅ उतरातॅ... उलट्या पायाये फिरातॅ तडॅ... “नेल्सन निघ्यासा रॅ” डेनिस आन गावश्या पोरायी विसारला.. नेल्सन रेडी झालॉ.. राती पावनेएक ला सगळे बोळींज चर्च ला जमले... “नेल्सन, आज यू एक काम कर्याससा...ताडा बाजूला जा पिंपळाआ झाड हाय त्या तू पान तॉडॉन हाडयासा... सबुत मनून... नेल्सन निंगालॉ... त्याला कडसॉ आलतॉ घाबरॉ... नेल्सन थॉडॉ पुढॅ गॅलॉ... आतॅ उजव्या बाजूला हॅतात डॅव्यासा... पुढॅ फक्त काळोख आन काळोख... हातात बॅटरी वैगेरे कय नाय... लांब गॉळप्यात चंद्र दिखातॉतॉ... का कय मायीत, कॉल्ल्यानॅ रड्या सुरू कॅल्ता...ऑड्यात सलताना नेल्सनश्या पायाला जॉरात ठेप बेहेली... हॅताआ हंदीवरसॉ दगड पायाआ मॅठ्याला लागलॉतॉ... का... कॉडा लागला... काळोखात कय कळला नाय... आतॅ नेल्सन पॉसलॉतॉ गॉळप्या भाटात... दिखला... यस... ता पिंपळा झाड आन त्या बाजूसॉ ताड... नेल्सननॅ घड्याळात बगीला... बरोबर रातसॉ एक वाजलॉतॉ... नेल्सन पिंपळा झाडाखाला पॉसलॉ... सबुत मनून २-३ पाने तॉड्याशे होतॅ... पिंपळायी फांदी थोडी वर होती... नेल्सननॅ विसार कॅलॉ... या ताडायो ४-५ पायर्योा तॅ हातात येदयात पाने... त्यानॅ चप्पल काडलॅ आन ताडोर सडलॉ... आ...आऊच... आयला ज्या मॅठ्याला लागलॉता तॉ मॅठॉस दाबलॉ परत... भळभळ मॅठ्यातनॅ रगात ताडा बुडोर पड्या लागला... आन अचानक... अचानक आयुष्यात पयल्यांदास नेल्सनश्या अंगाला कापरी भरली.. नेल्सननॅ पटकान २-३ पाने तोडले आन मागॅ फिरलॉ... सलताना त्याला पाय जड लागातॉतॉ... लांबनॅ त्याला बोळींज चर्चश्या बिल्डिंगवरशी लाल लाइट दिखातोती... बरास वेळ सलल्योर तॉ रस्त्योर पॉसलॉ...

“आलॉ... आलॉ... नेल्सन आलॉ” डेनिसनॅ गावश्या पॉरांना हाक दिली... नेल्सन हातात पिंपळाये पाने घेवॉन पॉसलॉतॉ...गावशॅ पोरे सगळे जमा जाले... “ये नेल्सन ये, डेरिंगबाज हा तू..मानला पाय तुला... आज तू २५००० शी कमाई केली... यॅ घॅ,” डेनिसनॅ २५००० सा पुडका काडला... नेल्सननॅ पैशॅ घ्यादो हात पुढॅ कॅलॅ.., आन आन यी का?.... जा डेनिसनॅ बगीला त्यानॅ डेनिसशी फाटली... नेल्सनशॅ दोनी हात... दोनी हात ऑइल पेंटनॅ रंगविलतॅ.... स स बोटाये २ पंजे... डेनिससा लक्ष नेल्सनश्या पायोर गॅला.... बाप रे... यी का?... नेल्सनशॅ पाय वाकडॅ जालतॅ... मागश्या बाजूला... “नेल्सन, नेल्सन का जाला?” डेनिसनॅ आड्डात आड्डात नेल्सनला विसारला... नेल्सन बारीकसॉ आहालॉ... अॅन बोयलॉ “मॅ...मॅ सावित्री, माये पोरे कडॅ हात. बारक्याला दूध पाज्यासा हाय आतॅ”...

सचिन मेंडिस, बोळींज

No comments: