Friday, August 21, 2009

स्वाभिमानी वसई कर आम्ही, घडवू नवी क्रांती

गीतकार: सचिन मैडिस

अस्तित्वाच्या लढाईसाठी, आज शपथ कोरली माथी I
वसई च्या रक्षणासाठी ढाल घेतली हाती I
भूक विसरूनी; तहान विसरूनी; लढू दिवस राती I
स्वाभिमानी वसई कर आम्ही, घडवू नवी क्रांती I

जात नाही, धर्म नाही, रंगही आमुचा नाही I
मुलं आम्ही ह्या मातीची, वसई आमची आई I
तोडूनी जाती- पाती आज, बाधू नवी नाती I
स्वाभिमानी वसई कर आम्ही, घडवू नवी क्रांती I

भूमीपुत्राच्या हक्का साठी, उभी आमुची चळवळ I
समाज संस्कृती जपण्या साठी, आहे आम्हा तळमळ I
हुकूमशाहीच्या अंधारात लावू, आम्ही स्वातंत्र्याच्या पणती I
स्वाभिमानी वसई कर आम्ही, घडवू नवी क्रांती I

विकासाचे नाव घेऊनी, वसई आमुची लुटली I
दलालाशी लढता लढता, वसई आमुची थकली I
आईच्या रक्षणासाठी, आज पुढे करूया छाती I
स्वाभिमानी वसई कर आम्ही, घडवू नवी क्रांती I

मूठभरांच्या स्वार्थ साठी, राजनीति ही चालली I
ग्रामसभेचा गळा घोटूनि, महापालिका ही लादली I
राज्य कर्त्यनो ऐका आज, नाही कुणाची भीती I
स्वाभिमानी वसई कर आम्ही, घडवू नवी क्रांती I

उतरू आम्ही रस्त्यावरती, वाट तुमची अडवू I
नव्या युगाची, नव्या दमाची, वसई आम्ही घडवू I
रक्त पेटवू, शब्द पेटवू, पेटवू स्वाभीमानाच्या ज्योती I
स्वाभिमानी वसई कर आम्ही, घडवू नवी क्रांती I

No comments: