उजळली माती, उजळले आकाश,
उजळले गावातील प्रत्येक हिरवे झाड
लपला होता सूर्य आजवर, दहशतीच्या ढगा आड
वसईच्या अंधाराला पाडले आपण प्रकाशाचे भगदाड
महापालीकेविरोधी सार्वमतात जिंकली आपली गाव
केली पूर्वेच्या सुर्यादयाची सुरुवात आज पश्चिमेच्या पट्ट्यात
आता होईल लाचारी कमी अन 'स्वाभिमानात' वाढ
वसईच्या अंधाराला पाडले आपण प्रकाशाचे भगदाड
आपल्या गावात केले आपण चोख आपले काम
सत्ता नाही आली पण फोडला सत्ताधार्यांना घाम
आता गावात तरी नाही येणार 'शिटी'चा आवाज
वसईच्या अंधाराला पाडले आपण प्रकाशाचे भगदाड
शहरातला उकिरडा, नाही येवू देणार 'हिरव्या' गावात
आपल्या गावात चालेल फक्त आपलेच राज
महापालिकेविरुद्ध मतदानाबद्दल आपले धन्यवाद
वसईच्या अंधाराला पाडले आपण प्रकाशाचे भगदाड
सचिन मेंडिस
No comments:
Post a Comment