हिंदाळॉ – एक जुनॉ दोस्त
“येला तू गाये... देला तू दूध... बायला माझ्या नीज आले... स्वताई प्रतिकृती वेंग्यात घॅवॉन.. हिंदाळ्यात गानॅ बोल्याशी मजास वेगळी. आपल्या आप्त्याई ऊब अनुभवित असतानास त्या हिंदाळ्याई साथ पण तोडीस उबदार. हिंदाळॉ.. प्रत्येक कुपार्या जुन्या घरा दापुडशा ओट्योर दिखनारॉ.. सल्तो.. बोल्तो.. हाल्तो... घरसो माहनू. आते काळवेळ बदललॅ भगून आतॅ भोट्टे हिंदाळे, एकदम मॉडर्न शिडशिडीत जाल्यात. कदाचित “डायटिंग” सो परकार हायदॅ. हिंदाळ्यावरती एक जुनॉ गानों हाय पन माला आतॅ आठवॅ नाय... ‘झोपाळ्यावर बसले‘अही काय तरी सुरवात हाय त्याई...
आमसा जुना घर एकदम भोठ्ठा होता. चित्रकार अर्नेस्ट रोड्रिग्सनॅ काडलेल्या चित्राहारका. ऑटो मिंन्जॅ एक लांबलसाक बॅटबॉलसा ग्राऊंड. दरवाज्या बाजूला बोठ्ठो बाक, नक्षीकाम कॅलॅलॉ आन त्याला घोड्या आकाराय बाजूनॅ दोन राखणदार. ओट्या एकाबाजूनॅ दोन मेडीमिने बोठ्ठो हिंदाळॉ. हागा लाकडापासून बनविलॅलॉ. शारी बाजूला नक्षीकाम. एकेक कडी मिंन्जॅ लोखांडाव रॉड. कडी अडक्याव्यादो पितळी वाटी आन खालशा बाजूला पितळीआ नक्षीदार फूल. ‘आये..गाये...बाबू मामा जाये...’ ई हिंदाळ्योर आयकिलॅला मा पयला गीत. आज सुध्धा बारके पोरे रड्या लागले गा हमखास या गान्यानॅ शांत होवू शकात्यात याई हमी अस्सल कुपारी देवू शकातॅ.
तिगाळा शेती मिंन्जॅ मुख्य धनदॉ. गव माहने भाटात्शे आले गा हात्सा सामान ओट्योर ठवॉन, आंगातसा सदरा काडॉन मस्त हिंदाळॉ गाव्याशे. मंग एखादी बिडी पॅटव्याशी. हिंदाळ्या वार्योर मस्त धोर निंग्यासा. यॅस गव माहने राती नवटाक मारॉन आले गा यास हिंदाळ्यात बॅहॉन आख्ख्या गावशी आय-माय काड्याशे. बायकाई हिंदाळ्यात बॅहॅना तिगाळा सलॅसा नाय, ता एक परकारसा बेशिस्त समजला जासा. एक परकारसो सामाजिक अन्याय हॉतॉ तॉ. पावसाळया दिहात हिंदाळ्यात बॅहॉन जिव्याशी मजास वेगळी. मस्त निरल्याव रस आन जोडीला बुंबलाई काडी, वार्याजोडीला आंगाला काटे हाडणारी पाण्याइ झड. का वातावरन होता ता. एसीमिने बॅहॉन पिझ्झा खाताना ता जुना ऐश्वर्य अनुभव्या मिळदॅ गा? नायूस. कते ताटात कालवान आन सपाती घॅवॉन खादो बॅहॅलॅ आन कुनॅ हिंदाळॉ गाविलॉ गा ता कालवान कहा डोलेसा ताटात. जाम भारीस. आख्ख्या सपातीला आपल्या वॅँग्यात घ्यासॉ. तहीस हाकोटे केलेली वालाई भाजी हानशापरा शाळीतनॅ आल्योर कडोल्यात धान घालॉन हिंदाळ्यात बॅहॉन खादो... आहाहा. आन नॅम्का त्यास वेळा हिंदाळ्याखाला भुकेले कुत्रे आन कोंबड्यो मान वर करॉन कय तरी ताटातनॅ पडॅशी वाट बगॅशॅ. पन तिगाळा कुन टाकीतोता जिवान? नातॅ आतॅ.. पोरांपेक्षा गावशे कुत्रे आन कोंबड्याई का तब्ब्यात केले.
मेंडिकोट आन पास-तीन-दोन यॅ पत्त्यामिनशे आवडतॅ खेळ. हिंदाळ्यात बॅहॉन खॅळॅशॅ. शार कोपर्याला शार डोखे आन मिनॅ टाकॅशे पत्ते. का त्या इस्पिकशा एक्क्याव रुबाब तिगाळा, आत्याशा आमदारालापन यासॉ नाय. कतॅ कतॅ या हिंदाळ्याला पन अॅक्सीडेंट हॉयेसा. मिंन्जॅ अॅखादी कडी पन सरक्याशी. तुट्याशी. आन थोडॅ दी तॉ पन आराम करॅसॉ. कितीतरी वेळा पोरे हिंदाळ्यातनॅ पडल्यात ई आपल्याला माइतुस हायदॅ. तिगाळा बारोट आन समेळ डॉक्टर नहल्यामुळे पडॉन डॉख्याला आलेल्या टेंबुराला सॉळॉन सॉळॉनुस इलाज हॉयेसॉ.
अहॉ यॉ हिंदाळॉ जॉहॉ सुखाव साक्षीदार हॉयेसॉ तॉहॉ दुखात पन रडॅसॉ. ज्या घारा मरान जालॅ त्या घरसॉ हिंदाळॉ काडॉन बाजूशा भितीला टॅकवॉन ठव्याशे. आजही ई रित हाय. त्या हिंदाळॅनॅस हांगीला हायदॅ की मा आंगा खांदयोर बोठ्ठो जालॅलॉ, सुखादुखायो वार्ता कॅलॅलॉ, मा जीवा काळजासॉ माहनू आज हॉडॉन गॅलॅ आन मॅ झॉकॅ कहॅ घ्याव. निर्जीव अहलॉ तरी जीव गॅलॅल्या माहनाव सन्मान करनारॉ हिंदाळॉ....
माला माइत नाय आतॅ किती घारा हिंदाळॅ रॅल्यात तॅ. पण यॉ लेख वासॉन आन जमला तॅ ओट्योर जावॉन एकदा तरी हिंदाळॉ गावा आणि त्याला हांगा “”आय लव यू, डियर”
सचिन मेंडिस, बोळींज