Thursday, September 18, 2014

भाव अन भावना !

भाव अन भावना !

गाडी फलाटाला लागली अन तो स्टेशनच्या बाहेर आला. बायकोने आज येताना फळे आणायला सांगितली होती. समोरच्या भैय्याकडे त्याने मोर्चा वळवला. 'भैया, एक किलो सेब देना, वो बडे वाले दे दो’. 'सेठ, ये बडे वाले २०० रुपये किलो है, थोडे मेहंगे है, लेकिन माल बढीया है' ! 'क्या, २०० रुपये किलो, और ये दुसरे वाले कैसे दिये'? 'ये सेठ, १६० रुपये किलो है' ! 'ठीक है, १६० रुपये किलोवाले देना' !

त्याने पिशवी घेतली अन तो घराकडे निघाला. रस्त्यात त्याने गाडी थांबवली अन तो बिअर शॉप कडे वळला. ‘भाऊ, २ किंगफिशर माइल्ड दे. चिल्ड हा'. 'दादा, किंगफिशर माइल्डचा भाव १० रुपयेने वाढला काल पासून. पण LP स्वस्त आहे, देऊ का? 'अरे काय पण तू भाऊ, किंगफिशर माइल्ड प्यायची तर १०-२० रुपये बघून चालेल का'? तू दे २ किंगफिशर चिल्ड अन २० रुपयाचे वाटाणे दे चाखण्याला‘. त्याने बिअरची पिशवी गाडीच्या डिगी मध्ये टाकली. सफरचंदाची पिशवी बिअरच्या पिशवीखाली दाबली गेली होती, त्यामुळे त्यांची घुसमट वाढली होती. आयुष्याच्या डिगीमध्ये बिअरचा भाव त्याच्यापेक्षा जास्त होता. बिअर सफरचंदाच्या डोक्यावर बसली होती, अन विकृतपणे हसत होती. सफरचंदाची पिशवी ओरडत होती पण तिचा आवाज कुणाला ऐकू येत नव्हता. बहुतेक सर्वांनी कान बंद केले होते.

सचिन मेंडिस

No comments: