Thursday, September 18, 2014

पेरू !

लहानपणी पेरू तोडण्यासाठी गावभर फिरायचो. छोटी छोटी अन कच्ची पेरू झाडावर चढून तोडण्यात अन घरमालकाच्या शिव्या खाण्यात तेव्हा वेगळीच मजा होती. आज अंगणातील झाड पेरूने नखशिखांत भरून गेलंय, सहज हाताला लागतील असे मोठे पेरू झाडाला लागलेत. पहिल्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर पाहिले तर अक्षरश: पेरूच्या डहाळी खोलीला स्पर्शून लागलेल्या आहेत. का कुणास ठाऊक पण पेरू तोडण्याची उर्मी आता मागे राहिलीय. कधी तरी झाडावर नजर टाकली तर एखादा पोपट किव्हा खारुताई छानपैकी पेरूवर ताव मारताना दिसते. अशा पक्षांना झाडावर पेरू खाताना पाहण्यात अन त्यात आपले बालपण शोधण्यात एक वेगळीच धुंद आहे. चिंब पावसात ती धुंद अनुभवण्याचे सुख मिळते, हे ही न थोडके !!

No comments: