Tuesday, October 30, 2012

तू, मी अन....

तू, मी अन वाफाळलेला चहा...
तुझ्या सहवासाचा ताजेपणा.....अहाहा...!!!

तू, मी अन धुवाधार पाउस....
तुझ्या ओल्याचिंब स्पर्शाच...स्वर्गीय सुख...!!!

तू, मी अन पहाटेचा वारा...
तुझ्या गुलाबी अस्तित्वाचा अंगभर शहारा...!!!

तू, मी अन मोगऱ्याचा सुगंध...
तुझ्या नशिल्या शरीराचा सुवास बेधुंध...!!!

तू, मी अन निंबूच सरबत...
तुझ्या ओठातून पिण्यास नसावी हरकत...!!!

तू, मी अन सागर किनारा ...
तुझ्या फेसाळलेल्या शृंगाराला माझ्या मिठीचा सहारा...!!!

तू, मी अन मंतरलेली रात ...
तुझ्या शरीरावर पसरले माझे प्रेमाचे हात ...!!!

तू, मी अन चिमणीच घरट...
तुझ्या माझ्या संसारला आज अनोखा अर्थ...!!!

No comments: