Tuesday, October 30, 2012

मैत्रीचा गंध

मैत्रीचा गंध का दरवळे, माझ्या मनी
ओळखीच्या प्रवासात का हि अनोळखी गाणी...

कोणते ते ऋणानुबंध जुळले त्या क्षणी...
पुसूनही जात नाहीत, त्या कोणत्या आठवणी...

का यावी आठवण, अन भिजावी पापणी...
शब्द का घालतात आज श्वासाला मागणी...

सगळंच मनात, केली बंदिस्त हि वाणी
आतुर डोळे करतात मनास आज गार्हाणी...

कोणता हा घाव, कातरतो माझी वाणी ...
नकळत का उभे माझ्या, डोळ्यात हे पाणी...

मैत्रीचा गंध का दरवळे, माझ्या मनी
ओळखीच्या प्रवासात का हि अनोळखी गाणी...

1 comment:

Unknown said...

very reliable poem ..really some relations r wealth of our life... but .have to moved on.