Saturday, November 24, 2012

लेकरू जन्मल जन्मल...



चित्रकार रोबर्ट परेरा ( भाटोरी) ह्यांनी रेखाटलेले अतिसुंदर चित्र.....!

जे सुख आधुनिक काळातील भौतिक गोष्टी देऊ शकत नाहीत, अशा गोष्टीची अनुभूती अशा चित्राने मिळून जाते.  अशे जुने वैभव पाहिल्यावर आपण काय सोडून कशाच्या मागे लागलो आहोत असा प्रश्न पडतो.

प्रश्नावर चिंतन केल्यास ग्लोबल जीवनाच्या भौतिक गरजावर उत्तर सापडू शकेल अस वाटते.

बाळाच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणे आली आहेत, असे म्हणण्यापेक्षा बाळाच्या तेजाने सूर्य प्रकाशित झाला असेल असे अतिरंजित उद्गार काढल्याशिवाय मला राहवत नाही.


लेकरू जन्मल जन्मल, कुपारी मातेच्या पोटी
तेजस्वी हे जणू, गोठ्याला सोन्याची रंगोटी...

धनी जीवाचा जवळ, बघे कौतुकाने बाळास
जसा जन्मला येशू, त्याच्या फाटक्या संसारात

पाठी उभ्या इमारती, नाही त्यास शोभा गोठ्यापरी
जे सुख आज गोठ्यात, नाही सर टोलेजंग घरी..

हाती कावड समोर किटली, बाबा हाक रे संसार ...
ख्रिस्त जन्मला पोटी, आता जन्माचा आधार ....