Saturday, November 24, 2012

'बाबा-बय ' च्या दारी ख्रिस्त जन्मला ....



'पौल डिमेलो' ( गास ) ह्यांनी काढलेल्या अप्रतिम चित्रावर सुचलेले काव्य

'बाबा-बय ' च्या दारी ख्रिस्त जन्मला ....

गर्भवती पवित्र मरिया I सुरु झाल्या तिला प्रसुती वेदना I
कुठे मिळेल आज आसरा I चिंता लागल्या योसेफाच्या मना I

कळा मरीयेच्या शरीरभर I अश्रू वाहती डोळ्यातून भळभळ I
ठोठाविली त्याने अनेक दार I नाही दिला परी कुणी आधार I

उघडले कौलारू घराचे एक दार I कंदील घेऊनी 'बाबा' आले बाहेर I
लाल टोपी, धोतर-कब्जी अंगात I मरिया-योसेफास घेतले घरात I

धावून आली 'बय' ती आतून I घेतले मरीयेस तांबड्या मिठीत I
किती मायेची तिची उब I क्षणभर कळ झाली मरीयेची दूर I

'बय' ने घेतले मरीयेस खोलीत आत I 'बाबा' बाहेर मदतीस तयार I
क्षणा-क्षणा वाढली मरीयेची कळ I पती योसेफ बाहेर व्याकुळ I

'बाबा-बय ' करती प्रार्थना I देवा, कर मरीयेची सुखरूप सुटका I
आला बाळा रडण्याचा आवाज I तारा उगवला पूर्वेच्या आकाशात I

योसेफ-मरीयेचा आनंद I क्षणी पोहचला त्या गगनांत I
अंधारलेले 'बाबा-बय'चे घर I येशू जन्माने झाले प्रकाशित I

'बाबा-बय' ते निपुत्रिक I वेशीबाहेर होते कायम उपेक्षित I
दारी जन्मला जगाचा मालक I निपुत्रिक बनले तारणारयाचे पालक I

No comments: